Home Cities जळगाव थकित मालमत्ता, पाणीपट्टी कर भरण्यासाठी ऑनलाईनची सुविधा

थकित मालमत्ता, पाणीपट्टी कर भरण्यासाठी ऑनलाईनची सुविधा

0
105


जळगाव प्रतिनिधी । कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील महानगरपालिकेच्या मालमत्ताधारकांना मागील वर्षापर्यंतचे थकित मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या थकित मालमत्ता कर व पाणीपट्टी रक्कम तसेच चालू आर्थिक वर्षाचे मालमत्त कर व पाणीपट्टी रक्कम भरण्यासाठी ३१ मार्च शेवटची मुदत असल्याने कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर गर्दी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या वतीने ऑनलाईन भरणा करण्यासाठी https://www.jalgaonmc.org या वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी नागरीकांना कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर थकित मालमत्ता कर ऑनलाईन पध्दतीने भरणा करावा असे आवाहन मनपा आयुक्तांना प्रसिध्दपत्रकाद्वारे केली आहे.


Protected Content

Play sound