परसाडे येथील शिबिरात २६ संशयितांची कोरोना तपासणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील परसाडे येथे सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोवीड लक्षणे असणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात जवळपासून २६ संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.  

कोविंड-19 च्या बाधीत रुग्णांची संख्या वाढतच असून त्याला आळा घालण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे , प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे , व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडासिम प्रा. आरोग्य केंद्राअंतर्गत कार्यक्षेत्रात गाव पातळीवर जनजागृती करून कोवीड-19 सदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची चाचणी करण्यात येत आहे. 

आज आरोग्य वर्धिनी केंद्र कोळवद येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी , डॉ. राहुल गजरे व भूषण पाटील यांनी परसाडे येथे 26 संशयित व्यक्तीची कोविड-19 ऑंटी रॅपिड टेस्ट केली असता सर्वांची चाचणी ही निगेटिव्ह आले. ग्रामस्थांनी लक्षणे दिसताच त्वरित कोविड-19 ची तपासणी करून घ्यावी आणि मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन डॉ. तडवी यांनी केले. जनजागृती व शिबीर यशस्वीतेसाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी, डॉ. राहुल गजरे , भुषण पाटील, महेमुदा तडवी, आशा सेविका यांनी परिश्रम घेतले.

Protected Content