कोरोना : कौटुंबिक पद्धतीत उरकला साखरपुडा !

 

पारोळा (प्रतिनिधी) कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पारोळ्यात अवघ्या पंधरा-वीस लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा संपन्न झाला. सामाजिक भान जोपासल्याबद्दल वधू-वरासह  त्यांच्या परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

पुनमचंद छगन चौधरी पारोळा यांचे चि.भूषण यांचा साखरपुडा येथील स्वर्गीय.भगवान रामदास चौधरी पारोळा यांची कन्या जयश्री हिच्याशी करण्याचे नियोजित करण्यात आले होते. त्या नियोजनाने दोघं कुटुंबियांनी ५०० ते ८०० नातेवाईक व आप्तेष्टांना फोनवरून निमंत्रण केले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वत्परी उपाययोजना करीत असल्याने दोन्ही परिवारांनी समन्वय साधला. तसेच तेली समाजाचे पंच संजय चौधरी व तेली समाज पंच मंडळाने साखरपुड्याची सर्व तयारी व उत्साह बघता पुढे न ढकलता हा सोहळा कौटुंबिक पध्दतीने संपन्न करावा. त्यानुसार अवघ्या १५-२० लोकांमध्ये हा सोहळा संपन्न झाल्याने शहरातून चौधरी परिवाराचे सर्वत्र अंभिनंदन होतं आहे. यावेळी पारोळा येथील पारोळा नगरपालिकेचे नगरसेवक अशोक चौधरी माजी शिवसेना प्रमुख आण्णा चौधरी तेली समाज मंडळाचे सचिव भरत चौधरी माजी नगरसेवक सुदाम चौधरी रामदास चौधरी पत्रकार विकास चौधरी उपस्थित होते.

Protected Content