जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने प्रताप नगरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सोमवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महापौर जयश्री महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
हॉकीचे संघाचे माजी कर्णधार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने देशात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने सोमवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रताप नगरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगाव हॉकी संघाच्या वतीने राबविण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर जयश्री महाजन आणि आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते जळगाव जिल्ह्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू, पंच व टेक्निकल क्रीडा शिक्षकांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिवछत्रपती अवॉरडी अशोक चौधरी, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांच्यासह खेळाडून भाग्यश्री पाटील, प्रवीण ठाकरे, आयशा खान, योगेश धोंगडे, सय्यद मोहसीन, वाल्मिक पाटील, डॉ. अनिता कोल्हे , सोनल हटकर, कृष्णा हटकर यांच्यासह आदी उपस्थित होते.