Home क्राईम टायर फुटल्याने वाहनाचा अपघात; जळगावचा तरूण ठार तर इतर पाच जखमी

टायर फुटल्याने वाहनाचा अपघात; जळगावचा तरूण ठार तर इतर पाच जखमी

0
104

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथून सिहोरला जाण्यासाठी निघालेल्या वाहनाचे अचानक टायर फुटल्याने झालेल्या अपघातात तुकाराम वाडीतील २४ वर्षीय तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चालकासह इतर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १५ जुलै रोजी सायंकाळी सेंधवा गावानजीक घडली आहे. सुरज रामेश्वर जोमाळकर (वय-२४) रा.तुकाराम वाडी, जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील तुकाराम वाडी येथे राहणारा तरूण सुरज जोमाळकर हा त्यांच इतर चार मित्रांसोबत शनिवारी १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारा भाडेतत्वावरील वाहन क्रमांक (एमएच १९ डीजे ७७७३) ने सिहोरला जाण्यासाठी निघाले. या गाडीत चालकासह एकुण सहा जण होते. सायंकाळी सेंधवा गावाजवळून जात असतांना चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने गाडी उलटली. या अपघातात सुरज जोमाळकर हा गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह इतर पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे काही वेळी महामार्गावरील वाहतूक खोळबंली होती. जखमींना नजीकच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मयत सुरजचे नातेवाईक रात्री उशीरा सेंधव्याकडे रवाना झाले होते.


Protected Content

Play sound