राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्पोर्ट्स हाऊसतर्फे मोफत हॉकी स्टिक वाटप

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त गरजू महिला खेळाडूंना मोफत हॉकी स्टिकचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी मेजर ध्यानचंद यांच्या बाबत तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विशद केले.

शहरात दोन विविध कार्यक्रम घेण्यात आले. जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून त्यांच्याप्रती त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांनी सादर केला तर जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी मेजर ध्यानचंद यांच्या बाबत तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी सौ चव्हाण यांनी तर प्रास्ताविक क्रीडा अधिकारी रेखा पाटील यांनी केले. आभार हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे यांनी मानले.

यावेळी हॉकीचे प्रशिक्षक अरविंद खांडेकर, क्रीडा अधिकारी एम.के.पाटील, हॉलीबॉलचे प्रशिक्षक चव्हाण, खो-खोचे प्रशिक्षण श्री थोरात, क्रीडा संकुलचे व्यवस्थापक गोविंद सोनवणे हॉकी जळगाव चे लियाकतअली सय्यद, जुबेर खान,माझाझ खान, सत्यनारायण पवार आदींची उपस्थिती होती. जळगाव स्पोर्टस हाऊसचे संचालक आमीर शेख यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त व मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त हॉकी स्टिकचे मोफत वाटप केले त्यात प्रामुख्याने ज्या मुली ची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे.

हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. अनिता कोल्हे यांच्या माध्यमाने हॉकी स्टिक दिल्या जाणार आहेत तर जे विद्यार्थी गरीब आहे त्यांना सुद्धा हॉकी जळगावचे संचालक व प्रशिक्षक लियाकत अली सय्यद यांच्यामार्फत हॉकी स्टिक दिले जाणार असल्याचे घोषित करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात खेळाडू जुबेर खान, मझाझ खान व सत्य नारायण पवार यांना हॉकी स्टिक भेट म्हणून देण्यात आली. हॉकी महाराष्ट्र व हॉकी जळगाव तर्फे प्रा. अनिता कोल्हे व लियाकत अली सैयद यांनी स्पोर्ट्स हाऊसचे मालक फारूक शेख व संचालक आमीर शेख यांचे आभार मानले.

Protected Content