गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्पाबाबत लवकरच अधिकाऱ्यांची बैठक ; खासदार उन्मेष पाटील

चाळीसगाव, प्रतिनिधी । गिरणा मन्याड नदीजोड प्रकल्प, मन्याड धरणाची उंची वाढविणे व मन्याड पाटचाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करावी यासाठी लवकरच तापी पाटबंधारे महामंडळाचे अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करून येत्या काळात हा विषय मार्गी लावणार असल्याची ग्वाही खासदार उन्मेष पाटील यांनी आज येथे दिली.

सकाळी अकरा वाजता खासदार उन्मेष पाटील यांच्या संपर्क कार्यालयात तालुक्यातील महत्त्वाचा गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प पुनरुज्जीवन समितीच्या सदस्यांची भेट घेतली. यावेळी संपन्न झालेल्या बैठकीत खासदार पाटील बोलत होते. याप्रसंगी भरत दगाजी पाटील (देवळी), दीपक पाटील (टाकळी प्रदे), पंकज रणदिवे (देवळी), तुषार निकम( धामणगाव) यांच्यासह शुभम पवार, शुभम जगतराव पवार, सुनील शिवदास पाटील, अंकुश बूरुकुल , आडगाव सरपंच रावसाहेब पाटील ,चंद्रकांत मोरे (पिलखोड), प्रशांत शिरसाठ (पिलखोड), प्रताप पाटील (माळशेवगे ), बाळासाहेब पाटील (माळशेवगे ), तुषार निकम (धामणगाव), सोमनाथ माळी (ब्राम्हणशेवगे), पृथ्वीराज पाटील (तमगव्हाण ), अमोल पाटील (तमगव्हाण),दिगंबर देवरे (शिरसगाव ), गौरव सोनवणे (तमगव्हाण), भूषण बोरसे (चिंचखेडा), विजय पाटील (आडगाव), विवेक रणदिवे (देवळी ), सुनिल पाटील (तमगव्हाण)आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्पाबाबत आमदार असताना केलेल्या प्रयत्नाचा व कामाचा आढावा मांडला. मन्याड धरणावर अलवाडी ,देशमुख वाडी, टाकळी, शिरसगाव, तळोदा ,पिलखोड ,पिंपराळ, पिंपरी, आडगाव, उंबरखेड, डोण, देवळी ब्राम्हणशेवगे,मंगळणे, वेहेळगाव, आमोदे,नांद्रे काकळणे, पिंपळवाड निकुंभ, माळशेवगे, हिरापूर,तमगव्हाण ,अंधारी ,तळेगाव, तळोदे, बिलाखेड ,बेलगंगा, सायगाव, मान्दुरणे, चिंचखेडे, सावरगाव ,पळाशी ,भोरस, हातगाव, दंडपिप्री, करगाव अशा सुमारे बत्तीस गावांची शेती मन्याड धरणाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहे.

तसेच गिरणा नदी जोड प्रकल्पाबाबत वेळोवेळी घेतलेली भूमिकेविषयी मार्गदर्शन केले. तसेच यापुढे काय पाठपुरावा करावा लागणार आहे याविषयी मार्गदर्शन करून वरिष्ठ अधिकारी यांचेशी संपर्क साधून पुढील कामास चालना मिळावी यासाठी भक्कम पाठपुरावा केला आहे. लवकरच गिरणा मन्याड धरण नदीजोड प्रकल्प ,मन्याड धरणाची उंची वाढवावी व मन्याड पाटचारी दुरुस्ती यासाठी तापी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी अभियंता यांचे संपर्क करून बैठक बोलावण्याची ग्वाही यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी समिती सदस्यांना दिली.

गिरणा मन्याड धरण नदीजोड ऐरणीवर
गिरणा व मन्याड धरणांमधील अंतरही खूप कमी आहे तसेच परिसरातील शेतकऱ्यांची समृद्धता मन्याड धरणावर अवलंबून आहे. त्यामुळे गिरणा व मन्याड दोन धरणांच्या नदीजोड करावे यासाठी आमदार असताना पाठपुरावा सुरू केला होता. तसेच त्यातून निघालेल्या पाटचाऱ्या नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. तेथे थांबून आजूबाजूच्या शेतांची नुकसान करते हे पाणी बंद पाइपद्वारे सोडण्यात यावे अशी मागणी सातत्याने या परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात असून हा परिसर सुजलाम सुफलाम् करण्यासाठी येत्या काळात गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प मार्गी लावणार असल्याचा विश्वास खासदार उन्मेष पाटील यांनी समिती सदस्यांना दिला.

लवकरच होणार बैठक
तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक व मुख्य अभियंता यांचे कडे पत्र पाठवून या विषयांबाबत तातडीने बैठक बोलवावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या विषयाला गती प्राप्त होणार असल्याने समिती सदस्यांसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content