उद्योगशिल नवनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या तरुणांच्या सदैव पाठीशी – खा.उन्मेश पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी । जिरेनियम शेती सुगंधी लागवडीवर आधारित या चाळीसगाव तालुक्यातील पहिला प्रकल्पाचे उद्घाटन होताना नवतरुणांनी नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा त्यांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा राहील, असा विश्वास खासदार उन्मेश पाटील व्यक्त केला आहे. आज धुळे रोड येथील जिजाऊ गार्डन समोर भक्ती मल्टी अग्रो प्रकल्पाचे उद्घाटन करताना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी वरील भावना व्यक्त केली.

भोरस परिसरात भक्ती अग्रो प्रॉडक्ट प्रकल्पाचे उद्घाटन संपन्न
पुढे ते म्हणाले की, आधुनिक शेती समृद्ध शेतकरी होण्यासाठी नवनवीन संकल्पना नवीन नवीन प्रकल्प याचा ध्यास आजच्या तरुणांनी घेतला पाहिजे असा उद्योगशिल नवनिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या तरुणांच्या पाठीशी व्यवस्था नक्की उभी राहते. असे सांगितले. जिरेनियम शेती सुगंधी लागवडीवर आधारित भक्ती मल्टी अग्रो प्रकल्पाचे खा. उन्मेश पाटील यांच्याहस्ते आज शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील, जामदाचे माजी सरपंच रवी पाटील, संचालक रुपेश राजपूत, दिनेश राजपूत, प्रकाश देवरे, धनंजय रणदिवे, आदेश राखुंडे, महेंद्र देवरे, बादल राजपूत, पंकज चव्हाण, चतुरसिंग सूर्यवंशी, सरदारसिंग ठोके आदी शेतकरी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार उन्मेश पाटील यांच्याहस्ते या मशिनरी प्लान्टचे पूजन करण्यात आले. यावेळी संचालक रुपेश राजपूत दिनेश राजपूत यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांचा सत्कार केला.

Protected Content