चाळीसगाव नगरपालिका मुख्याधिकारी पदी नितीन कापडणीस

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव नगरपालिकेला गेल्या काही वर्षांपासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी पदभार मिळाला नव्हता. मात्र हि प्रतिक्षा आता संपली असून कायमस्वरूपी मुख्याधिकारी पदी नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली असून आज त्यांनी पदभार स्वीकारला.

मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त असलेले नितीन कापडणीस यांची नुकतीच चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बदलीनंतर  मुख्याधिकारी हे पद  रिक्त झाले होते .या रिक्त पदावर प्रभारी  मुख्याधिकारी म्हणून भडगाव चे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी कार्यभार सांभाळला होता. संपूर्ण राज्यात एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून नितीन कापडणीस  यांची ओळख आहे. मंगळवार दि 4 रोजी दुपारी नगरपालिकेच्या मुखाधिकारी पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला. 

यावेळी नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, नगरसेवक दीपक पाटील, राजेंद्र चौधरी, सूर्यकांत ठाकूर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.याप्रसंगी नगरपालिकेचे विवीध विभागाचे अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते. चाळीसगांव नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाल्याने शहरातील विविध प्रकारच्या समस्या  त्यांच्या कार्यकाळात ते मार्गी लावतील अशा अपेक्षा शहरवासीयांच्या आहेत.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.