कोरोनाने अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्यासाठी विशेष कक्ष !

मुंबई प्रतिनिधी । कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना दत्तक घेण्यासाठी सोशल मीडियातून अनेक पोस्ट फिरत असतांना यात गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. यामुळे या मुलांना दत्तक घेण्यासाठी महिला व बालविकास विभागाने स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला आहे.

सध्या कोरोनामुळे अनेक स्त्री-पुरूषांचा मृत्यू होत असल्यान बरीच बालके अनाथ होत आहेत. या अनाथ बालकांचा सांभाळ कोण करणार हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. दरम्यान, अनाथ बालकांना दत्तक घेण्यासाठीच्या पोस्ट देखील सोशल मीडियातून फिरू लागल्या आहेत. यासाठी कॉन्टॅक क्रमांक देखील दिले जात आहेत. तथापि, याचा लाभ काही समाजकंटक घेण्याची शक्यता आहे. याचसाठी महिला व बालकल्याण विभागाने स्वतंत्र कक्ष कार्यान्वित केला आहे.

अशी अनाथ बालके . आढळल्यास मंत्रालयाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती व पोलीस यंत्रणेशी त्वरित संपर्क साधून या बालकांना त्यांच्या ताब्यात द्यावे. या सर्व मुलांची शासनामार्फत योग्य ती काळजी घेण्यात येईल. त्याशिवाय विशेष मदत कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे.

बालक दत्तक घेण्यास इच्छुक असलेल्या पालकांसाठी कायदेशीर दत्तक विधान प्रक्रियेची सविस्तर माहिती केंद्र शासनाच्या ‘कारा’ (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी) या प्राधिकरणाच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्या आधारे हे पालक दत्तकासाठी अर्ज नोंदणी करू शकतात,

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.