जामनेर, प्रतिनिधी | कर्नाटकात काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे गंभीर प्रकार उघडकीला आले आहे. यामुळे अशांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षांतर्फे करण्यात आले आहे.
कर्नाटक राज्यात काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केल्याचे प्रकार उघडकीला आले आहेत. या घटनेचे जाहीर निषेध करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. शहरातील नगरपालिका चौकात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते संजय दादा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे घटनेचा निषेध करण्यात आला. त्यामुळे तातडीने अशांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत , युवक तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील , शहराध्यक्ष पप्पू पाटील , जळगाव जिल्हा बँक संचालक नाना भाऊ पाटील , अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अनिस पैलवान , ओबीसी सेल तालुकाध्यक्ष राजू नाईक ,जामनेर शहराचे माजी नगरसेवक अनिल बोहरा , युवक शहराध्यक्ष विनोद माळी , जामनेर शहराचे माजी नगरसेवक नरेंद्र जंजाळ , शहर उपाध्यक्ष संतोषभाऊ झाल्टे , ओबीसी सेल शहराध्यक्ष प्रभू झाल्टे , राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खालिद साहब , हिम्मत भाऊ राजपूत , प्रल्हाद बोरसे , शहर उपाध्यक्ष इमरान शेख ,युवक सचिव अहेफाज मुल्लाजी , सामाजिक न्याय शहर उपाध्यक्ष जलील शेख , मोहन चौधरी, शहर उपाध्यक्ष उत्तम पाटील, रहीम बागवान, शहर उपाध्यक्ष दत्ता नेरकर , पराग नेरकर, सचिन बोरसे, शाहिद शेख, साबिर मिस्तरी, अझहर सय्यद, समीर सय्यद, दीपक पाटील भराडी, रफिक शेख, अबू लाला, गजानन पाटील, विशाल माळी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.