मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलीस वाहनावर झाड पडून झालेल्या अपघातात प्राण गमवावे लागलेले पोलीस कर्मचारी कै. अजय चौधरी यांच्या कुटुंबियांचे आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आ. चंद्रकांत पाटील यांनी सांत्वन केले.
एरंडोल नजीक जळगाव गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातार व चालक अजय चौधरी अपघातात दुदैवी निधन झाले होते. चालक अजय चौधरी हे मुक्ताईनगर येथील रहिवासी असून त्यांच्या पार्थिवावर काल येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आज राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांत्वनपर भेट दिली व कुटुंबियांचे सात्वन केले. याप्रसंगी त्यांच्या सोबत आमदार चंद्रकांत पाटील हे देखील होते.
याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी मयत चौधरी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करतांना त्यांना शासकीय पातळीवरून सर्वतोपरी सहाय्य मिळवून देण्याची ग्वाही दिली. त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी शासन आणि प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचेही पालकमंत्री आणि आमदारांनी नमूद केले.