सागवान वृक्षांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करा !

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील सातपुडा जंगलातील सागवानाची कत्तल करणार्‍यांसह त्यांना सहकार्य करणार्‍या वन कर्मचार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनहित विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी वनमंत्री यांच्याकडे पत्र पाठवुन केती आहे

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित कक्ष विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील सातपुडा जंगलातील डोंगर कठोरा पायझीरी पाडा या राखीव वन खंड कंपार्टमेंट क्रमांक७९ / ८०या क्षेत्रात मागील काही दिवसापासुन मौल्यवान सागवानच्या शेकडो वृक्षांची बेकायद्याशीर तोड करण्यात आली. यासंदर्भात वनविभागाने वृक्षतोड करणाऱ्यांवर केलेली कार्यवाही योग्य आहे. परंतु या क्षेत्रात वनविभागाच्या शासकीय सेवेत असलेल्या वनपाल, वनरक्षक, वनमजुर हे या वन क्षेत्रात कार्यरत असतांना एवढया मोठया प्रमाणावर ही वृक्षतोड झालीच कशी, याबाबत संशय निर्माण होत असून वन विभागाने वरिष्ठ पातळीवर या सर्व प्रकाराची तात्काळ चौकशी करून या घटनेत वृक्षतोडीला थांबविण्यात अकार्यक्षम असलेल्या संबधीतांवर वाघझीरा पश्चिम क्षेत्रात झालेल्या कार्यवाही प्रमाणे संबधीतांवर निलंबनाची कार्यवाही करावी, अशी मागणीचे पत्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

या संदर्भात अशा प्रकारे सातपुडा जंगलाचा नायनाट करणाऱ्यांवर कार्यवाही न झाल्यास आपण मनसे स्टाईल आंदोलन करू असा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्षाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिला आहे. या संदर्भात वरीष्ठ पातळीवर देखील माहीती देण्यात येत आहे.

Protected Content