अवैध दारूच्या विरोधात पाडळसेकरांचा एल्गार !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाडळसे येथे अवैध दारूमुळे एका तरूणाचा बळी गेल्यानंतर ग्रामस्थांनी याच्या विरोधात निवेदन देऊन याला पायबंद घालण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील पाडळसा येथील दारूबंदी हा विषय मागील अनेक वर्षापासून ग्रामसभेत गाजत आहे. येथे अवैधरित्या सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे विक्री होणार्‍या गावठी हातभट्टीची दारूमुळे यापूर्वी अनेक जीव गेलेले असून यात तरुणांची संख्या मोठी आहे. असे असतांना देखील संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणा मुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, गावठीच्या अतिसेवनामुळे दोन दिवसापुर्वी एका तरुण मुलाला आपला जीव गमवावा लागल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. काल रात्री संपुर्ण ग्रामस्य मंडळीने एकत्र येत ग्रामपंचायत वर धडक मोर्चा काढण्यात आला. गावठीला पायबंद घालण्यासाठी पोलिसांची भूमिका ही महत्त्वाची असून पोलिसांच्या भूमिकेवरच संबंधित गुन्हेगारी अवलंबून असल्याचे प्रतिपादन माजी प्रभारी सरपंच खेमचंद्र कोळी यांनी केले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांनी ग्रामसभेतच सांगीतले की मी गावातील कायमची दारूबंदी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं ठोस आश्वासन देऊन ठराव स्वीकारला..

दरम्यान, पाडळसे गावातील पूर्वीच्या तंटामुक्त समितीने देखिल गावात दारूबंदी व्हावी याकरिता विशेष ठराव घेऊन संबंधित अधिकारापर्यंत पोहोचवले. मात्र तरी देखील प्रशासकीय पातळीवर यश आले नसल्याची नाराजी तंटामुक्ती पदाधिकार्‍यात चर्चिली जात होती. दारू विक्री करणार्‍यांना पोलिसांकडूनच अभय मिळते. त्यामुळे ही मंडळी कोणालाही न घाबरता बिनधास्तपणे आपला व्यवसाय चालू ठेवतात. काहींनी यापुर्वी अनेक वेळा फैजपुर पोलीस ठाण्यातला अर्ज दिलेले आहे पण होते असे की, याबाबत लगेच संबंधित दारू वाल्यांना पोलीस कडूनच फोन जातो यांनी तुमच्या विरूद्ध अर्ज दिला आहे किंवा वृत्तपत्रात बातमी येताच, बातमी आल्यामुळे आम्हाला तुमच्यावर कारवाई करावी लागते आहे असे उत्तर देऊन त्यांच्याकडे बोट पोलीस दाखवत असतात.त्यामुळे आम्हाला कारवाई करावी लागते असे उत्तर दिले जाते असे ग्रामस्थात चर्चिले जात होते.

गावठीच्या अतिसेवनामुळे पाडळसा येथे पुन्हा याच्या विरोधात उद्रेक निर्माण झाला. याप्रसंगी सरपंच गुणवती पाटील ग्रामविकास अधिकारी सी. एच. वाघमारे, माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे, पोलिस अमलदार गोकुळ तायडे,उमेश चौधरी, ज्ञानेश्वर पवार, बाळू भोई सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सुरज कोळी, भैय्या कोळी,समाधान कोळी, ज्ञानेश्वर भोई, दशरथ कोळी, दिलीप भोई, संग्राम कोळी,वासुदेव कोळी, आनंद तायडे, युवराज कोळी नितीन तायडे, रोशन कोळी, संदेश कोळी आदी उपस्थित होते.

Protected Content