तरूणाने केले असे काही. . .संपूर्ण परिसर शोकसागरात !

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील केर्‍हाळा येथील युवकाने आज टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

निंभोरासिम येथील तापी नदीच्या पुला वरुन एका ३५ वर्षीय युवकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

केर्‍हाळा येथील रहीवासी असलेला संदीप ब्रह्मानंद महाजन ( वय ३५ ) याने आज सकाळी अकराच्या सुमारास निंभोरासिम तापी नदीच्या पुला वरुन उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मयत संदीप महाजन हा विवाहीत असुन अनेक वर्षा पासुन विटव्यामध्ये रहीवास करत होता. त्याने आत्महत्या का केली याच कारण समजू शकले नाही.या बाबत निंभोरा पोलिस स्थानकात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, संदीप महाजन यांच्या आत्मघातामुळे केर्‍हाळ्यासह विटवा परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content