Home Cities जामनेर छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

0
39


जामनेर, प्रतिनिधी | कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना काही समाजकंटकांनी केली. अशांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी तालुक्यातील बेटावद बु. येथे बोलताना केले.

 

कर्नाटक येथील बंगळूरमध्ये काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व व्हीजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील बेटावद बु. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुग्धाभिषेक व पूजा करून अभिवादन करण्यात आले. व घडलेल्या या घटनेचे जाहीर निषेध नोंदविण्यात आले. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचार आपण अमलात आणून त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चालायला पाहिजे. त्याचबरोबर गावात शांतता राखण्यासाठी युवकांनी प्रयत्न केले पाहिजे. कारण गावात शांतता राहिली तरच गावाचा विकास करण्याबाबत नियोजन होते. त्यामुळे आपण आता छत्रपतींच्या विचारांवर चालावे असे आवाहन राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी केले आहेत.

यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, विजय सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस संदीप पाटील, भुसावळ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष दीपक मराठे, बेटावद बुद्रुक उपसरपंच गोपाल कदम, अजय मराठे, मुकेश कराडे, वाय. आर. पाटील, नितीन दारकुंडे, नाना ढगे, रवी भोईटे, मिलिंद गाने, ईश्वर करे, दीपक पाटील, नामदेव पाटील, रमेश मराठे यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound