जळगाव विमानतळावर बॉम्ब शोधक मोहिमेचा मॉक ड्रील

जळगाव प्रतिनिधी । जळगाव विमानतळावर बॉम्ब  असल्याची धमकी मिळाली असल्याचा कॉल येताच पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सतर्क होत त्यांनी विमानतळाचा ताबा घेऊन कसून चौकशी केली असता हि केवळ मॉक ड्रील असल्याचे कळताच सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.

 

 

याबाबत माहिती अशी की, जळगाव विमानतळाच्या टर्मीनल इमारतीत बॉम्ब असल्याचा कॉल ट्रुजेट एअरलाईनच्या कार्यालयात दुपारी १ वाजता आला. बॉम्ब असल्याची सुचाना मिळताच एअरलाईन्सचे सुरक्षा व्यवस्थापक यांनी तात्काळी सर्व प्रवाशी व कर्मचारी यांना इमारत खाली करण्याच्या सुचना देण्यात आल्यात. विमानतळ संचालकांनी तात्काळ ही वार्ता सर्व सुरक्षा संबंधत येणाऱ्या भागधारकांशी संपर्क साधून कळविण्यात आली. अवघ्या १५ ते २० मिनीटात सर्व यंत्रणा विमानतळावर दाखल झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांच्या मार्गदर्शनाखाली बीडीडीएस पथकाने इमारतीचे निरीक्षक करून अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने व प्रशिक्षित श्वान पथकाचा उपयोग करून बॉम्बचा शोध घेवून बॉम्बला विमानतळावर असलेल्या बॉम्ब कुलींग पीटमध्ये नेवून निकामी केला. हे संपुर्ण प्रक्रिया ३५ मिनीटात आटोक्यात आणली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या नेतृत्वाखाली बॉम्ब रिव्हू कमेटीची बैठक घेण्यात आली. यात प्रत्यक्षिकात कमतरते बाबत सुचना देवून चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी बॉम्ब शोध पथकाचे प्रमुख आर.डी. मोरे, मुख्य सुरक्षा अधिकारी सोनू पटेल, सहाय्यक सुरक्षा अधिकारी मोज्जुद्दीन शेख, डॉ. नितीन विसपूते, डॉ. विलास मालकर, हेमा चंदर, पोलीस नाईक राजेश पाटील, महेद्र पाटील, विशाला पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content