कोरोना : जिल्ह्यात आज एक पॉझिव्हिट रुग्ण आढळला नाही

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार आज दिवसभरात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ८०७ बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार २२४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ५ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Protected Content