जळगाव प्रतिनिधी । आसारी बनविण्याच्या कंपनीतून लोखंडी कच्चा माल चोरून नेणाऱ्या तीन संशयितांना रंगेहात पकडून रिक्षासह तिघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
रिक्षाचालक मनोज लक्ष्मण पवार (वय-४१), भरत मधुकर सोनार (वय-२७) आणि प्रशांत पंडीतराव सावळे (वय-२५) दोन्ही रा. गजानन महाराज मंदीराजवळ सुप्रिम कॉलनी असे संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दतील चिंचोली शिवारात असलेली भवानी माता मंदीराजवळ फ्रिंन्स इंटरप्राईजेस लोखंडी आसारी बनविण्याची कंपनी आहे. या कंपनीला रक्षाबंधनाच्या निमित्ताचे ३ ऑगस्ट रोजी सुट्टी होती. त्याठिकाणी वॉचमन म्हणून जगन सोनवणे रा. गलंगी ता.चोपडा हे काम पाहतात. आज ४ जुलै रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास कंपनीच्या गेटच्या बाहेर येत असतांना रोडावर रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ६६४९) यात तीन व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. वाचमन सोनवणे यांची रिक्षाची पाहणी केली असता त्यांनी कंपनीत आसारी बनविण्याचा कच्चा लोखंडी माल चोरून रिक्षात भरला होता. दरम्यान वॉचमन यांनी त्यांनी कंपनी मालक धनराज भिका पाटील यांना बोलावून घेतले. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर रिक्षाचालकासह इतर दोघांना एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी केली असता रिक्षाचालक मनोज लक्ष्मण पवार (वय-४१), भरत मधुकर सोनार (वय-२७) आणि प्रशांत पंडीतराव सावळे (वय-२५) दोन्ही रा. गजानन महाराज मंदीराजवळ सुप्रिम कॉलनी असे संशयित आरोपींची नावे आहेत. तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ दिनकर खैरनार, संतोष सोनवणे, शांताराम पाटील, सिद्धेश्वर डावकर यांनी यांनी कारवाई केली.