‘श्रीराम’ रेखाटनाद्वारे साकारले अयोध्या दर्शन

फैजपूर, प्रतिनिधी । हिंदू धर्माचे आराध्य दैवत श्रीराम यांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा अयोध्या येथे उद्या ५ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. याचे औचीत्य साधून राजू साळी यांनी आगळेवेगळी पेंटिंग काढले आहे.

श्री.एस.बी.चौधरी,हाय.चांगदेव, शाळेचे कला शिक्षक राजू साळी यांनी राम जन्मभूमी पूजनाचे औचित्य साधून कल्पकतेने कॅलिग्राफीमध्ये श्रीराम नावाचे आगळे वेगळे असे नवनिर्मिती करून नावातच प्रभुराम व हनुमान यांच्या प्रतिमेचे पैंटींग तयार केली आहे. या पेंटिंगमध्ये “श्री” अक्षरामध्ये प्रभुराम यांचा चेहरा दाखवण्यात आला आहे.व ” रा” अक्षरात हनुमान दाखवण्यात आला आहे. संपूर्ण नाव विटेवर उभे आहे. आकाशात राम मंदिर दिसत आहे. राजू साळी यांनी सांगितले की, प्रभुराम हे हिंदू धर्माचे आदराचे स्थान आहे. सर्वांचे प्रेम त्यांच्यावर आहे व श्रीराम अक्षरातच राम, हनुमान आहे.ही पैंटींग पोस्टर कलर माध्यमात 24×36 आकारात तयार केली आहे. ही पेंटिंग प्रतंप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आतापर्यंत राजू साळी यांनी कोरोना विषयावर पैंटींगद्वारेब सामाजिक जनजागृती करतच आहे.

Protected Content