चैतन्य तांड्यातील सभा मंडपाचे काम अखेर मार्गी

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चैतन्य तांड्यातील सभा मंडपाचे काम अखेर मार्गी लागले असून या कामासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपये मंजूर झाले आहे. त्यानुसार आज सभा मंडपाचे भुमिपूजन सरपंच अनिता राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

तालुक्यातील चैतन्य तांड्यात सभा मंडप व्हावे यासाठी माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे मागणी करीत राहिले. त्यानंतर आता राठोडांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. आमदार स्थानिक विकास निधीतून नुकतीच गावाला सभा मंडपासाठी २५ लाख रुपये मंजूर झाले आहे. त्यानुसार आज सोमवार रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास लोकनियुक्त सरपंच अनिता राठोड यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. त्यामुळे याठिकाणी आता गोरगरिबांच्या मुलामुलींची लग्ने, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम भव्य स्वरूपात करता येणार आहे. तत्पूर्वी भुमिपूजन प्रसंगी नागरिकांच्या चेहऱ्यांवर विलक्षण आनंद दिसून आला. व आमदार मंगेश चव्हाण यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी आभार मानले आहे. यावेळी सरपंच अनिता दिनकर राठोड, उपसरपंच आनंद राठोड, ग्रामस्थ राठोड, मधुकर राठोड, वसंत राठोड, गोरख राठोड, वसंत चव्हाण, गणपत जाधव, धर्मा जाधव, संदीप पवार, राजेंद्र चव्हाण, भाऊलाल चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content