पाचोऱ्यात उद्या युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पाचोरा मतदार संघात “युवा तेथे सेना” राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने, सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर ऑनलाइन प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून पाचोरा युवासेनेतर्फे शहरात व ग्रामीण भागात सदस्यता नोंदणी अभियान उपक्रम उद्या राबवण्यात येणार आहे.

शहरात दि. २६ एप्रिल मंगळवार रोजी सकाळी ठीक १० ते १ यावेळी महाराणा प्रताप चौक व शिवसेना मध्यावर्ती कार्यालय या दोन ठिकाणी नोंदणी करण्यात येईल. सदर नोंदणी ऑनलाइन असल्यामुळे बॅनर वरील क्यु. आर. कोड स्कॅन करून किंवा www.joinyuvasena.com या लिंक वर जाऊन पण आपण सदस्य होऊ शकतात. सदस्य झाल्यावर आपल्याला लागलीच आदित्य ठाकरे यांच्या सहीचे ओळख पत्र ऑनलाइन डाऊनलोड करता येईल. युवासेना ही युवकांच्या प्रश्नांवर काम करणारी, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमात्र संघटना आहे. युवकांना समाजकारणात संधी देऊन त्यांना व्यक्त होण्यास व्यासपीठ देणारी संघटना आहे. विविध कला कौशल्य, शैक्षणिक उपक्रम राबवणारी संघटनाआहे. समाजाचं ही काही देणं लागतं या हेतूने जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा व विकासात्मक, सकारात्मक राष्ट्रनिर्मिती मध्ये आपले योगदान देवुन सहभाग घ्यावा. असे आवाहन युवानेते सुमित किशोर पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, तालुकाप्रमुख सौरभ चेडे, शहरप्रमुख संदिपराजे पाटील, अनिकेत सूर्यवंशी यांनी केले आहे.

Protected Content