शुभम टोकेची डॉक्टरेटसाठी कॅनडाला निवड

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | निमखेडी तालुका मुक्ताईनगर येथील शुभम सुभाष टोके यांची डॉक्टररेट ( पी.एच.डी.) साठी कॅनडा येथे निवड झाली आहे. त्यांचे निवड झाल्या सर्वत्र कौतुक होत आहे.

शुभम हा निमखेडी येथील माजी सरपंच आणि जिल्हा दूध संघाचे संचालक सुभाष टोके यांचा मुलगा आहे.

शुभम यांचे शिक्षण बी.एस.सी. पदवी (संगणक) फर्ग्युसन कॉलेज, पुणे पोस्ट ग्रॅज्युएशन – जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट स्टडीज मध्ये पदव्युत्तर पर्यंत झाले आहे. तर आता CAT आणि MH-CET द्वारे त्यांची पीएचडी अभ्यासक्रम साठी कॉलेज तर्फे कॅनडा येथे निवड झाली आहे.पी.एच.डी साठी माहिती प्रणाली हा विषय आहे.संपूर्ण महाविद्यालयातून वेगवेगळ्या पीएचडी विषयांमध्ये फक्त 6 विद्यार्थी निवडले गेलेले आहेत.त्यात माहिती या विषयासाठी पीएचडी अभ्यासक्रमासाठी शुभम यांची एकमेव निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीद्वारे युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया,व्हँकुव्हर,कॅनडा येथे फेलोशिप (स्टाइपेंड) सह प्रवेश मिळालेला आहे. शुभम हा एका छोट्या खेडेगावातून आणि मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला मला देशाबाहेर शिक्षणासाठी जाण्याची संधी मिळतेयं ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियांसाठी भाग्याची गोष्ट आहे.माझे स्वप्न पूर्ण होईल अशी ही संधी मिळाली आहे, असे त्याने सांगितले.

Protected Content