…आणि मुख्यमंत्र्यांचा तोल जाताच मदतीला धावले गिरीशभाऊ !

0
1

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधीमंडळाच्या पायर्‍यांवर तोल गेल्यानंतर मदतीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन धावून आल्याचे चित्र आज दिसून आले.

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. यात मयत सभासदांना श्रध्दांजली अर्पण केल्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सहकार्‍यांसह जात असतांना विधीमंडळाच्या पायर्‍यांवर अडखळले. त्यांचा तोल गेल्याचे पाहताच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी तातडीने त्यांना आधार देऊन खाली पडण्यापासून वाचविले.

ना. गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून आल्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. भारतीय जनता पक्षासाठी संकटमोचकाची भूमिका बजावणारे गिरीशभाऊ हे मुख्यमंत्र्यांच्या मदतीला देखील धावून आल्याचा सूर यातून उमटला आहे.