चिनावलात कोरोनाची एंन्ट्री; प्रौढ रूग्ण पॉझिटीव्ह

सावदा प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील चिनावल गावात एका संशयित रुग्णाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडालीय. आढळून आलेल्या रूग्णाच्या घराजवळील परिसर सील करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील सेंट्रल बँक व सोसायटी समोरील भागात वास्तव्य करणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. संबंधित रूग्णाला जिल्हा कोविड रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर चिनावल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.विजया झोपे, डॉ.सुभाष ठाकूर, डॉ. ठाकूर, पोलीस पाटील निलेश नेमाडे, तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सरपंच योगेश बोरोले यांनी बाधित व्यक्तीच्या घरी जाऊन संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी केली. संपर्कातील सर्वांना आज संध्याकाळपर्यंत जवळील सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. यावेळी रावेर गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनास सूचना केल्या असून परिसर सील करण्याचे काम सुरू आहे. तलाठी उमेश बाबूळकर, ग्रामसेवक अशोक खैरनार, पंचायत सदस्य व कर्मचारी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Protected Content