Home आरोग्य धरणगाव येथे भारतीय जनता पार्टीतर्फे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

धरणगाव येथे भारतीय जनता पार्टीतर्फे होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

0
57

धरणगाव, प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टीकडून आर्सनिक अल्बम 30 हे होमिओपॅथी औषधीचे नगरसेवक तथा गटनेते कैलास माळी व उप गटनेते ललित येवले यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक १ व ६ प्रभाग मध्ये वाटप करण्यात आले.

आर्सेनिक अल्बम 30 होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप प्रसंगी नगरसेवक संगीता गुलाब मराठे, गुलाब मराठे , संजय महाजन, नितिन चौधरी, सुनिल चौधरी, किरण वाणी, प्रल्हाद बाबुराव पाटील, दिपक चौधरी, भिकन गुरव, सौरभ येवले,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कैलास माळी सामान्य कुटुंबातील शिक्षक पेश्या मधली असुन ललित येवले सामान्य कुटुंबातील आहेत. कोरोनाचा माहमारीत सुरवातीला ललित येवले यांनी प्रभाग क्र ६ मध्ये स्वतःच्या पैशांनी प्रभागामध्ये घरोघरी जावुन सॅनीटायझर वाटप केले. ललित येवले यांच्यासोबतीला गुलाब मराठे पण खांद्याला खांदा लावून प्रभागामध्ये काम करत आहेत.


Protected Content

Play sound