चिंताजनक : परीक्षा दिल्यानंतर तब्बल ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

बंगळूरू (वृत्तसंस्था) परीक्षा दिल्यानंतर तब्बल ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात उघडकीस आली आहे.

 

कर्नाटक बोर्डाने काही दिवसांपूर्वी एसएसएलसीच्या (SSLC) परीक्षा घेतल्या होत्या. ही परीक्षा दिलेल्या तब्बल ३२ विद्यार्थ्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकामध्ये जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. २५ जून पासून ही परीक्षा सुरू झाली होती. मात्र परीक्षा देऊन आलेल्या ३२ विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र कर्नाटक बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयावर टीका केली जात आहे.

Protected Content