यावल ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्षाची स्थापना

WhatsApp Image 2019 04 27 at 4.11.50 PM

यावल( प्रतिनिधी) तालुक्यात व यावल शहरात गेल्या दोन दिवसापासुन तापमानाचा पारा हा ४६ अंश सेल्सीयस वर पहोचल्याने सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे.  सकाळी  ११ वाजे पासुनच शहरातील रस्ते हे र्निमन्युष्य होवु लागले आहे.  यावल ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

 

वाढत्या तापमानात कुठली काळजी घ्यावी यासंदर्भात यावल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमीत तडवी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. अमित तडवी यांनी सांगीतले की सद्या उष्णतेचे प्रमाण अधिक वाढले असल्याने ग्रामीण रुग्णालयात उष्मघातकक्ष उघडण्यात आला आहे. त्यांनी नागरीकांच्या आरोग्य विषयी उष्णतेपासून सुरक्षीत राहण्याविषयी मार्गदर्शन पर सुचना दिल्या आहेत. यात नागरीकांनी दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे, पिण्याचा पाण्याचा भरपुर वापर करावा, निंबु शरबत हे उष्णतेला मारक असून ते जास्त जास्त प्यावे, ओआरएसचे पाणी याच बरोबर ताप येणे, मळमळ येणे, धाम येणे, उलटया येणे हे उष्मघाताचे लक्षण असल्याचे सांगितले. उष्माघात झाल्यास वरील उपाययोजना करावी पण शक्यतो दुपारच्या १२ते ५ वाजेपर्यतच्या काळात बाहेर जाण्यास टाळणे हे अति उत्तम असेल असेही त्यांनी पुढे संगितले.

Add Comment

Protected Content