बोदवड ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय सेवा अभावी रूग्णांची गैरसोय

बोदवड प्रतिनिधी । शहरातील ग्रामीण रूग्णालयाला तालुक्यातील ५० ते ५२ गावे जोडले गेले आहेत. परंतू ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नसल्याने वैद्यकीय सेवा मिळत नाही. यामुळे खेडेगावाहून आलेल्या नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.

 

बोदवड ग्रामीण रूग्णालयात अनेक दिवसांपासून रूग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. वैद्यकीय अधिकारी हे वेळेवर जागेवर हजर राहत नसल्यामुळे ही गैरसोय होत आहे. रूग्णालयात सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० दरम्यान तपासणी वेळ ठरवून दिलेली आहे. परंतू वैद्यकीय अधिकारी हे सकाळी १० वाजेपर्यंत रूग्णालयात येत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान खेडेगावातून आलेल्या गोरगरीब रूग्णांना यांचे हाल होत आहे.

 

बोदवड ग्रामीण रुग्णालयाला २४ तास सेवा देण्याकरिता एकच डॉक्टर असल्याकारणाने मला २४ तास सेवा देणे अश्य होत नाही. त्याकरिता मला एखाद्या वेळेला सकाळी येण्यासाठी उशीर होत असतो. परंतु ओपीडी पूर्ण करीत असतो, शासनाकडे वारंवार डॉक्टरांची मागणी होत असून सुद्धा डॉक्टर उपलब्ध होत नाही, त्याकरिता रुग्णांची एखाद्या वेळेस गैरसोय होत असते.

-डॉ. अमोल गिरीजी, प्रभारी वैद्यकीय अधिकारी, बोदवड

Protected Content