नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना व्हायरसमुळे शुक्रवारी ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला. भारत इटलीला मागे सोडून करोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
कोरोना व्हायरसमुळे शुक्रवारी ३३४ रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी इतके मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्रात करोनामुळे शुक्रवारी सर्वाधिक १३९ मृत्यू झाले. दिल्लीमध्ये ५८, गुजरातमध्ये ३५, तामिळनाडू, उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी १२ आणि बंगालमध्ये ११ मृत्यू झाले. इटलीमध्ये दोन लाख ३४ हजार ५३१ रुग्णांना करोनाची बाधा झाली होती. भारतात हीच संख्या दोन लाख ३६ हजार ११७ आहे. भारतात करोना चाचणीचा वेग वाढल्यामुळे रुग्ण संख्या देखील वेगाने वाढत आहे. दरम्यान, भारतात शुक्रवारी ४,८३३ रुग्णांसह एकूण १,१२,३१८ रुग्ण बरे झाले. ही संख्या एकूण रुग्णांच्या ४९.३ टक्के आहे. १५ दिवसांपूर्वी हा दर ४२ टक्के होता.