देशाला पंतप्रधानांचं घर नको, श्वास पाहीजे ; राहुल गांधींची टीका

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशाला पंतप्रधानांचं घर नको, श्वास पाहीजे  अशी टीका आज राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली

 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर टीका करण्याची मालिका सुरुच ठेवली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उशिरा उपाययोजना केल्याने देशाला त्याची किंमत मोजावी लागली असा निशाणा ते वारंवार साधत आहेत. आजही राहुल गांधी यांनी सेंट्रल विस्ट प्रकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. करोनामुळे हे काम रोखण्याची मागणी जोर धरत आहे. सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. कोरोना स्थितीत केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी सेंट्रल विस्टा प्रकल्प गेल्या काही दिवसांपासून वादात अडकताना दिसत आहे.

 

‘देश को पीएम आवास नहीं, सांस चाहिए’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी दोन तुलना करणारे फोटोही शेअर केले आहेत. त्यात एका बाजूला सेंट्रल विस्टा प्रकल्पाचं सुरु असलेलं काम आणि दुसऱ्या बाजूला कोरोना झालेले रुग्ण श्वासासाठी लढताना दाखवण्यात आले आहेत.

 

 

नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न असल्याची बोचरी टीका त्यांनी शनिवारी ट्वीटमधून केली होती. ‘जनता के प्राण जाए पर PM की टॅक्स वसूली ना जाए’, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. त्याचबरोबर हॅशटॅग जीएसटीचाही वापर केला होता.

 

विस्टा प्रकल्प संसदेसमोरील १३ एकर जमिनीवर उभा राहात आहे. सध्या या जमिनीवर पार्क, पार्किंग आहे. ते हटवून त्या ठिकाणी लोकसभा आणि राज्यसभेची इमारत उभी केली जात आहे. या प्रकल्पासाठी ३० हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

 

 

Protected Content