Home Cities जळगाव मुख्यमंत्री व ना. गिरीश महाजन यांची बंद द्वार चर्चा

मुख्यमंत्री व ना. गिरीश महाजन यांची बंद द्वार चर्चा

0
113

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासगी कार्यक्रमासाठी अल्प काळ जिल्हा दौर्‍यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या सोबत बंद द्वार चर्चा केली.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात आले. विमानतळावर मान्यवरांसह प्रशासकीय अधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर त्यांनी ना. गिरीश महाजन यांच्या सोबत चर्चा केली. सध्या लोकसभा निवडणुकीची धुमधाम सुरू असून जळगाव आणि रावेर या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे आहेत. या पार्श्‍वभूमिवर मुख्यमंत्री आणि ना. गिरीशभाऊ यांच्यातील चर्चा महत्वाची मानली जात आहे.

शिंदे आणि महाजन यांच्यातील चर्चा ही बंद दाराच्या आड झाली. यानंतर मुख्यमंत्री हे कार्यक्रमासाठी रवाना झाले. येत्या काही दिवसांमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार जोर धरणार असून याआधीची ही बैठक महत्वाची मानली जात आहे.


Protected Content

Play sound