नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशभरात गेल्या २४ तासांत ३४ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या ९०९ ने वाढली आहे.
देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात आतापर्यंत ७५०० इतक्या लोकांना करोनाची लागण झाली आहे. देशात महाराष्ट्र राज्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण असून महाराष्ट्रात रुग्णांची संख्या १७६१ इतकी झाली आहे. संपूर्ण जगभरात आतापर्यंत 1,676, 265 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 103,660 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 20.8 टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 3 लाखांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. जगातील एकूण 213 देशांमध्ये कोरोना व्हायरस पसरला आहे.