फेसबूक अकाऊंटवरून आत्मघातकी हल्ल्यांची धमकी : जळगावात खळबळ

586926f4 6e2c 4800 a023 5daf1f0ffde4

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ‘आतीया रिचार्ज’ नावाने फेसबूक अकाउंट असलेल्या आणि स्वत:ला मोहम्मद कलीमुद्दीन खान म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने आज (दि.२२) एका फेसबूक पोस्टद्वारे आपण ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा जिहादी दहशतवादी असल्याचे जाहीर केले असून लवकरच देशातील पाच मोठ्या शहरात आपल्या साथीदारांसह आत्मघातकी बॉम्बहल्ले करणार असल्याची धमकी दिली आहे. या पोस्टमुळे खळबळ उडाली असून जळगाव पोलिसांचा सायबर सेल याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.

 

या पोस्टमध्ये खान याने बॉम्बस्फोटाच्या कटात आपली पत्नी इरशाद बेगम खान व आपला भाऊ मोहम्मद राहिमुद्दिन खान हे दोघेही सहभागी असल्याचे म्हटले आहे. त्याने देशाच्या भावी पंतप्रधानालाही जीवाच्या भीतीने सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आपण पाठीत खंजीर खुपसत नसल्याचा दावा त्याने केला असून त्यासाठीच ही पोस्ट टाकल्याचे म्हटले आहे. दरम्यान हा मोहम्मद कलीमुद्दीन खान आणि त्याचे कुटुंब गेल्या चार-पाच महिन्यांपासून फरार असून काही जणांची लाखो रुपयांची फसवणूक करून ते सगळे बेपत्ता झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळेच हा प्रकार त्यांनी आपला कुणी शोध घेऊ नये म्हणून भीती निर्माण करण्यासाठी केला असावा किंवा त्यांनी ज्यांची फसवणूक केली आहे त्यांच्यापैकी कुणी पोलिसांनी त्यांचा कसून शोध लावावा, यासाठी केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

या हल्ल्यासाठी आपण कधीपासूनच तयारी करीत असून कोट्यवधी रुपये खर्च करून आता हे काम आम्ही आमच्या बापाच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी करीत आहोत. देशाच्या कायद्याने न्याय न मिळाल्यामुळे बदला घेण्यासाठी आपण हे काम करीत असल्याचा दावाही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. शक्य असेल तर आम्हाला पकडून दाखवावे व देश वाचवावा, असे आव्हानही त्याने सरकारला दिले आहे.

‘आतीया रिचार्ज’ नावाचे हे दुकान शहरातील शेरा चौकात सुरेंद्र जैन शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये ४५ क्रमांकाचे आहे. या दुकानाच्या माध्यमातूनच कलीमुद्दीन याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती प्राप्त झाली आहे. फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर पो.स्टे. ला गुन्हा दाखल झाल्यानंतर हे संपूर्ण कुटुंब गेल्या जानेवारी महिन्यापासून फरार आहे. त्यानंतर आता ही पोस्ट उघड झाल्याने पोलिसांचा सायबर सेल तिच्या सत्यासत्यतेचा तपास करीत आहे.

Add Comment

Protected Content