यावल तालुक्यात सर्रासपणे गुटख्याची विक्री

यावल प्रतिनिधी । तालुक्यात सर्वत्र सर्रासपणे सार्वजातिक ठीकाणी उघडपणे लाखो रुपयांचा गुटखा विक्रीला जात असुन अन्न वऔषध प्रशासन विभाग व पोलीस प्रशासनाचे या अवैध व्यवसायाकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करण्यात घेत असल्याची ओरड नागरीकाकडुन होत आहे.

यावल तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासुन शेजारील राज्यातून छुप्या मार्गाने तर काही ठिकाणी बसेसच्या मार्गाने उघडपणे गुटखामाफीयाच्या माध्यमातुन मध्यप्रदेश या शेजारी राज्यातुन तस्करी करून आणण्यात येत आहे. यात दर महिन्याला सुमारे २५ लाख रुपयांच्या गुटख्याची सार्वजनिक ठिकाणी मोठया प्रमाणावर विक्री करण्यात येत असल्याचे दिसुन येत आहे. या गुटखा व्यसनाच्या आहारी १० वर्षीय अल्पवयीन मुलापासून तर तरुण युवा वयोवृध्द नागरीकांसह महीला ह्या मोठया प्रमाणावर बळी पडत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन विभागापासून पोलीस प्रशासनाचे या गंभीर विषयावर आर्थीक स्वार्थापोटी दृर्लक्ष होत आहे. वारिष्ठ पातळीवर या संदर्भात दखल घेतल्याशिवाय न्यायल्याचे आदेश धुडकावून अवैध मार्गाने गुटका व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरीकांकडून होत आहे.

Protected Content