नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ६२२ वर पोहचली

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिक जिल्ह्यात आज आणखी ५० जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ६२२ झाला आहे.

 

नाशिक जिल्ह्यात नुकतेच 50 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यातील सर्वाधिक ४९ रुग्ण हे मालेगावमधील आहेत. तर एक रुग्ण नाशिक शहरात आढळला होता. तर नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत १९ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. मालेगाव शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा ४९७ वर पोहोचला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता १९ हजार ०६३ वर पोहोचली आहे.

Protected Content