जळगावात एलसीबीने पकडली दोन लाखाची दारू; तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात संचारबंदी लागू असतांना शहरातील राज वाईन्सच्या सिलबंद गोडावूनमधून बेकायदेशीर खासगी वाहनातून दोन लाखाची देशी विदेशी दारू पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आज सकाळी यश आले असून तिघांना अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, अजिंठा चौफुलीवरील राज वाईन्सजवळ आज पहाटे ३.३० ते ३.४५ वाजेच्या सुमारास तिघेजण खासगी वाहनाने बेकायदेशीर देशी विदेशी दारू घेवून जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांना मिळाल्यानंतर एलसीबीचे कर्मचाऱ्यांनी सकाळी कारवाई करत राज वाईन्सजवळ खासगी कार क्रमांक (एमएच १८ डब्ल्यू ९८४२) तपासणी केली असता त्यात कारमध्ये २ लाख रूपये किंमतीचे देशी विदेशी दारू बंद खोक्यांमध्ये आढळून आली. याप्रकरणी अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले आहे. कारसह संशयित आरोपी राज वाईन्सचे मालक दिनेश राजकुमार मोठवाणी रा. आदर्श नगर यांच्यासह नितीन श्यामराव महाजन, महेंद्र अशोक भावसार दोन्ही रा. अयोध्या नगर या तिघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी दोन लाख रूपये किंमतीची देशी विदेशी दारू आणि तीन लाखाची कार असा एकुण ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनखाली पोहेकॉ राजेश मेढे, संजय हिवरकर, सुनिल दमोदरे, रविंद्र घुगे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, दर्शन ढाकणे, महिला पोलीस कर्मचारी वाहिदा तडवी, चालक रमेश जाधव, अशोक महाजन यांनी कारवाई केली.

Protected Content