चीनच्या राष्ट्रपतींचा अचानक तिबेट दौरा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अचानक अरुणाचल प्रदेश जवळील तिबेटचा दौरा केला.

 २०११ साली सत्तेत आल्यानंतर जिनपिंग यांचा हा पहिला तिबेट दौरा आहे. चीनचे राष्ट्रपती तिबेटची राजधानी ल्हासामध्ये आहेत. भारत चीन सीमा वाद सुरु असताना त्यांनी केलेल्या दौऱ्याकडे आंतरराष्ट्रीय जाणकारांचं लक्ष लागून आहे. शी यांनी ब्रह्मपुत्र नदीवर बनलेल्या पुलाची पाहणी केली. चीन ब्रह्मपुत्र नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधत आहे. भारताने या प्रकल्पाला विरोध केला आहे.

 

न्यिंगची तिबेट एक महत्त्वपूर्ण शहर आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर असल्याने या शहराला विशेष महत्त्व आहे. चीन अरुणाचल प्रदेशावर आपला दावा सांगत आहे. मात्र भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. भारत चीन सीमा वादात ३,४८८ किमी लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलचा सहभाग आहे. चीन आणि तिबेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. तेराव्या दशकात चीनचा तिबेटवर ताबा होता. मात्र तिबेट चीनचा दावा फेटाळून लावत आहे. १९१२ मध्ये तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनी तिबेट स्वतंत्र असल्याची घोषणा केली होती. तेव्हा चीनकडून कोणताही आक्षेप घेण्यात आला नव्हता. मात्र ४० वर्षानंतर चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीचं सरकार आलं आणि विस्तारवादी निती अवलंबली गेली. १९५० मध्ये चीनच्या हजारो सैनिकांनी तिबेटवर हल्ला केला. जवळपास ८ महिने चीनचा तिबेटवर ताबा होता. अखेर तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनी १७ मुद्द्यांच्या करारावर हस्ताक्षर केलं. त्यामुळे हा भूभाग चीनचा असल्याचं मानलं जात आहे. मात्र दलाई लामा करार दबावाखाली केल्याचं सांगत आहेत.

 

चीनने एप्रिल २०२१ च्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा घुसखोरी सुरू केली. त्या वेळी काही चिनी ड्रोन विमाने भारतीय हद्दीत आली होती व त्यांनी या भागाची टेहळणी केली असे संरक्षण सूत्रांनी सांगितले. मे व जून महिन्यात डेमचोक व चुमार या दक्षिण लडाखमधील भागात गस्त सुरू असताना तेथे नागरी वेशातील चिनी सैन्याचे अस्तित्व आढळून आले. मे महिन्याच्या मध्यावधीत भारतीय सैन्याने चिथावणी दिली नसतानाही चिनी सैन्याने अनेक ठिकाणी संघर्षाचा पवित्रा घेतला, त्यामुळे तणाव निर्माण होऊन भारतीय सैन्य पुन्हा तैनात करण्यात आले.

 

मे २०२० मध्ये घुसखोरी केल्यापासून पीएलएने दक्षिण गलवानमधील गोग्रा व हॉट स्प्रिंग क्षेत्रातून माघार घेण्यास नकार दिला आहे. गोग्रा चौकी ही भारतासाठी संवेदनशील असून तेथे अजूनही सैन्य तैनात आहे. पीपी १७ ए बिंदूजवळ भारतीय हद्दीत अर्धा किलोमीटर आतपर्यंत चीनने घुसखोरी केली आहे. पीपी १७ व पीपी २३ या ठिकाणी चीनने गोग्रा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जमवाजमव केली असून तेथील तोफगोळा, दारूगोळा, हवाई संरक्षण यंत्रणा, अवजड वाहने अगदी कमी काळात भारतात येऊ शकतात. पँगाँग सरोवराच्या दक्षिणेला कैलाश रेंज येथे चिनी सैन्याने पुन्हा ताबा घेतला असून ब्लॅक टॉप व हेल्मेट हे सोडलेले भाग पुन्हा काबीज केले आहेत.

 

Protected Content