चाळीसगाव, प्रतिनिधी | कै. घेवरचंद सवजी राठोड यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा समाज चेतना पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराने वर्धमान धाडीवाल, गुणवंत सोनवणे व प्रमोद चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले आहे.
दरवर्षी कै. घेवरचंद सवजी राठोड यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना समाज चेतना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्याअनुषंगाने यंदाच्या पुरस्काराने वर्धमान धाढीवाल, गुणवंत सोनवणे व प्रमोद चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना क्रांतीकारी संत सेवालाल महाराज विचार प्रबोधन मिशन सेंटर येथे आयोजित एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन क्रांती मोर्चाचे मुकेश नेतकर तर प्रमुख अतिथी म्हणून मेरा गाव मेरा तीर्थचे विजय शर्मा, प्राणीमित्र इंदल चव्हाण, तालुका साप्ताहिक संघ-अध्यक्ष राजेंद्र चौधरी, एम.आय.एम मुक्तार कुरेशी हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी देवेंद्र नायक, प्रा. गौतमकुमार निकम, सोमनाथ माळी (ब्राम्हणशेवगे), नीलकंठ साबणे (अध्यक्ष अपंग बहुउद्देशीय संस्था), अशोक राठोड (ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन), भीमराव जाधव (शेतकरी कृती बचाव समिती), प्रदीप पाटील (मा ग्राम. सदस्य टाकळी प्र. चा), योगेश मोरे ( महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ), संजय मिस्तरी ( दिव्यांग संस्था देवळी), सत्यजित पाटील (सचिव कामगार मजदूर संघटना), रूपसिंग जाधव (कृष्णापुरी), सुनील चव्हाण (विसापूर), राहुल अहिरे (चाळीसगाव), दत्तू जाधव (अंधारी), धर्मराज खैरनार (चित्रकार), देवेश पवार (शहराध्यक्ष, अपंग जनता दल), गंगाराम राठोड (सामाजिक कार्यकर्ता), अनिल महिराळे (तालुकाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), देवेंद्र पाटील, मनोहर दुसाने, जयचंद चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव, शकील मणियार आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रूपसिंग जाधव व देवेश पवार यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक योगेश्वर राठोड यांनी तर सुत्रसंचालन अशोक राठोड यांनी केले.