Home धर्म-समाज २२ जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर करा ! भाजप नेत्याची मागणी

२२ जानेवारीला सार्वजनिक सुटी जाहीर करा ! भाजप नेत्याची मागणी

0
44


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शतकानुशतकांच्या संघर्षानंतर प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या आयोध्या धाममध्ये उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात दि.२२ जानेवारी रोजी रामलल्ला विराजमान होणार आहेत. या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे.

या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घोपे यांनी या संदर्भात पत्र लिहिले आहे.


Protected Content

Play sound