चाळीसगावात ‘विधवांचे मालमत्ता विषयक’ शिबिर उत्साहात

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील जहागिरदारवाडी येथे ‘विधवांचे मालमत्ता विषयक अधिकार’ शिबिर उत्साहात संपन्न झाला. यावेळी विधवा महिलांना एकत्रित करून सदर कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आली.

चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ व लोकनायक तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील जहागिरदारवाडी येथे ‘विधवांचे मालमत्ता विषयक अधिकार’ शिबिर मंगळवारी उत्साहात संपन्न झाला. मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली.

यावेळी न्यायमूर्ती एन.के.वाळके यांचे पर्यावरण रक्षणाचा संदेश जावा यासाठी जलमित्र परिवारातर्फे झाडाचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. सुचित्राताई राजपुत, संस्थापक लोकनायक तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपुत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळ चाळीसगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. तर अँड.एन.एम.लोढाया, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी विधवांचे ‘मालमत्ता विषयक अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव एन.के.वाळके यांनी विधवांचे मालमत्ता विषयक अधिकाराबाबत उपस्थित महिलांना त्यांच्या संपत्तीचा अधिकार कसा मिळेल याविषयी कायदेशीर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित महिलांच्या शंकाचे निरासन केले. त्याचबरोबर कौटुंबिक हिंसाचार, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजना याविषयी मार्गदर्शन व शंकाचे समाधान केले. त्यांच्या काही समस्या असल्यास तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव यांचेकडे अर्ज देण्याची विनंती केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव, तालुका वकील संघ चाळीसगाव अँड. माधुरी बी. एडके यांनी केले. तर आभार स्वाती पवार, सदस्या लोकनायक तात्यासाहेब महिंद्रसिंग राजपुत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळ चाळीसगाव यांनी केले. सदरील कार्यक्रमास हजर असलेल्या ४४ महिलांनी लाभ घेतला. उपरोक्त कार्यक्रमाचे नियोजन डी.के.पवार, डी.टी.कु-हाडे, दिनेश डिगराळे यांनी यशस्वीरित्या पार पाडले.
याप्रसंगी जलमित्र परिवार चाळीसगावचे शशांक अहिरे, राहूल राठोड, सोमनाथ माळी, हरचंद्र पवार, रिजवानाताई, भारतीताई शिंदे, प्रीती रघुवंशी, छाया राजपूत, वैशाली काकडे, मेघा पाटील, गीता पाटील व भाग्यश्री लदे उपस्थित होते.

Protected Content