हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त जळगावात लसीकरण शिबिर

जळगाव प्रतिनिधी | हिंदुहृदयसम्राट, बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त ‘युवासेना जळगाव’च्या वतीने खान्देश मिल कॉम्प्लेक्स, स्टेशन रोड, नेहरू चौक जळगाव येथे लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आज बुधवार, दि.१९ जानेवारीपासून सुरु झालेल्या या लसीकरण शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, विधासभा संपर्कप्रमुख प्रा.समाधान पाटील व महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक १९ ते ३१ जानेवारी दरम्यान लसीकरण शिबीर राबविण्यात येत आहे. या ठिकाणी १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोवॅक्सिन तसेच कोविशील्डचा पहिला, दुसरा व बुस्टर डोस उपलब्ध राहणार आहे.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी महापौर नितीन लद्धा, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहापौर कुलभूषण पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना सहसचिव विराज कावडीया, युवती सेना विस्तारक डॉ. प्रियांका पाटील, नगरसेवक ललित कोल्हे, नितीन बर्डे, अनंत जोशी, प्रशांत नाईक, गजानन मालपुरे, चेतन शिरसाळे, पवन सोनवणे, सरिता माळी कोल्हे, महिला महानगरप्रमुख शोभा चौधरी, मंगल बारी, मनीषा पाटील, निळू इंगळे, युवासेना महानगरप्रमुख स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, यश सपकाळे, सागर हिवराळे, गिरीश सपकाळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवासैनिक स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, प्रीतम शिंदे, शंतनू नारखेडे, अमित जगताप, हितेश ठाकरे, संकेत कापसे, संदीप सूर्यवंशी, चेतन कापसे, उमाकांत जाधव, अमोल मोरे, सौरभ कुलकर्णी, प्रशांत वाणी, वैष्णवी खैरनार, यशश्री वाघ, सायली गांधी, पियुष गांधी, जय मेहता, राहुल चव्हाण, सचिन चौधरी, विजय लाड, अतुल घुगे, जितू बारी, अंकित कासार आदी. परिश्रम घेत आहे.

Protected Content