पहूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा – फुले विद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन

पहूर प्रतिनिधी | महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .

भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथाचे पूजन करण्यात आले अध्यक्षस्थानी इतिहास विभाग प्रमुख हरीभाऊ राऊत होते. शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही.व्ही. घोंगडे यांनी त्यांचा सत्कार केला. शाळेचे शिपाई व वडाळी ग्रामपंचायतचे सरपंच संजय बनसोडे यांनी नाशिक येथे यशदा संस्थेचे विभागीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला .

प्रारंभी पुनम देशमुख या विद्यार्थिनीने सविधान गीत सादर केले. रूपाली सोनवणे या विद्यार्थिनीने स्वरचित कविता सादर केली. विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले .सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेंरे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके देऊन सन्मानित केले.

याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना राऊत म्हणाले की, “भारतीय संविधान हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. त्यानुसार सर्व भारतीयांनी आचरण केले पाहिजे.” शितल बारी आणि भाग्यश्री मिस्त्री यांनी भारतीय संविधानाचे प्रकट वाचन केले. यावेळी 26 /11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले तर आभार बी एन .जाधव यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Protected Content