चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | एसटी आरक्षण लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी आज धनगर समाजाच्या वतीने धुळे रोडवरील अहिल्यादेवी चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी समाजाच्या वतीने आज शहरातील मालेगाव- धुळे रोडवरील अहिल्यादेवी चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
तत्पूर्वी गेल्या ७५ वर्षापासून धनगर समाज आरक्षणासाठी भांडतोय परंतु आजही धनगर समाजाला आरक्षण मिळालेले नाही. घटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगर समाजाला आरक्षण लागू केले आहे. परंतु धनगड आणि धनगर र आणि ड च्या वेंगाड्यात सरकारला धनगर समाजाला अडवून ठेवले आहे. धनगड राज्यात अस्तित्वात नसताना राज्यात धनगर समाज हा मोठ्या संख्येने आहे. इतर राज्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण लागू आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाला कायमच आरक्षणापासून वंचित ठेवले. आजच्या आंदोलनाची ही फक्त ठिणगी आहे. यापुढे तालुक्यात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धनगर समाज पेटून उठेल असा इशारा यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.
याप्रसंगी मारुती काळे, गणेश जाने, साहेबराव आगोने, संदिप देवरे, अशोक देवरे, खंडू कोर, व तालुक्यातील सकल धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.