वैयक्तिक शौचालय न बांधता अनुदान लाटणाऱ्यांवर मनपातर्फे गुन्हे दाखलाची तयारी

WhatsApp Image 2019 06 18 at 2.46.07 PM

जळगाव (प्रतिनिधी) शहरात वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान घेऊन देखील बांधकाम न करणाऱ्या ४०७ जणांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. ही कारवाई मनपाच्या आरोग्य विभागाने सुरु केली आहे.

शासनाने सप्टेंबर २०१५ मध्ये जळगाव शहरातील किती नागरिकांकडे वैयक्तिक शौचालय नाही याचा सर्वे केला होता. या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने वैय्यक्तीक शौचालय नसलेले ८ हजार ५८ नागरिकांना वैय्यक्तिक शौचालय बांधण्याकरीता प्रोत्साहन म्हणून शासनाकडून १२ हजार रुपये व महानगरपालिकेच्या चौदाव्या वित्त आयोगातून ५ हजार रुपये असे एकुण १७ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. त्यामुळे ८ हजार ५८ लाभार्थ्यांपैकी ९४.५८ टक्के लाभार्थ्यांनी आपले शौचालयांचे बांधकाम पुर्ण केले परंतु यापैकी ८१० लाभार्थ्यांनी अनुदानाचा पहिला हप्ता (६ हजारांचा) घेवून देखील शौचालयाचे बांधकाम सुरु केलेले नसल्याचे दिसून आले होते. या लाभार्थ्यांना शौचालय बांधण्याबाबत मनपाच्या आरोग्य विभागाकडून ३ वेळेस नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या मात्र, तरीही संबधिताकडून कृती होत नसल्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, कारवाईच्या भितीने काहींनी अनेकांनी कामाला सुरुवात केली असून ३३ जणांनी कारवाईच्या भितीने अनुदान महानगरपालिकेकडे परत केले आहे. तसेच मंगळवारी उर्वरीत ४०७ जणांवर शहरातील विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Protected Content