बाहेती प्रतिष्ठानतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गरजू विद्यार्थ्यांना अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानतर्फे बाहेती महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते वह्या व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी मंत्री सुरेशदादा जैन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, संघपती दलिचंद जैन, नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन लढ्ढा, डॉ. सुनील महाजन, नितीन बरडे, उज्ज्वला बाहेती, रोहन बाहेती, प्राचार्य डॉ. अनिल लोहार, शशी बियाणी, शरद तायडे व श्याम कोगटा यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात गरीब व गरजू अशा तब्बल १५ हजार विद्यार्थ्याना ९० हजार वह्या व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्याम कोगटा यांनी प्रास्ताविकातून भूमिका मांडली. ते म्हणाले की, अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठानतर्फे २७ वर्षांपासून गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत वह्या व लेखन साहित्य वाटप करण्यात येत आहे. पुढील वर्षी १ लाख वह्या व शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात येणार असून, यासाठी सुरेशदादा जैन व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. प्रा. बी. जे. लाठी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. यु. के. फासे यांनी आभार मानले. मनोज चौधरी, प्रा. सतीश कोगटा, रमेश माळी, गणेश गायकवाड, राजू मोरे, पवन ठाकरे, प्रकाश पाटील, संजीव बागुल, विनोद बिरपन, मनोज चौधरी, कैलास चौधरी, रमेश माळी, आनंद महांगडे, जितेंद्र वाघ यांनी सहकार्य केले.

Protected Content