किलबिल बालक मंदिर शाळेत ऑनलाईन पालकसभा

 

जळगाव, प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर या शाळेमध्ये सीनियर बालवाडीच्या पालकांची ऑनलाइन सभा मंगळवार दि २२ रोजी घेण्यात आली.

कोरोना च्या कार्यकाळात विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून शिकविता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑडिओ व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यात पालकांच्या काही अडचणींचे ऑनलाइन निरसन करण्यात आले.

त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा चौधरी यानी विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा. त्यांचा शब्दसंग्रह कशाप्रकारे वाढवावा.G.k चे ज्ञान कसे द्यावे याबद्दल सांगितले. वहीवर, पाटीवर लिहिण्याचा सराव करणे तसेच घेण्यात येणाऱ्या स्पर्धां बद्दल माहिती दिली. जसे की महात्मा गांधी भाषण २ ऑक्टोबर. मनाचे श्लोक, कथाकथन स्पर्धा इत्यादी
तसेच सीनियर बालवाडीच्या शिक्षिका अर्चना चौधरी यांनी अभ्यासा विषयी मार्गदर्शन केले त्यावेळी शिवम गटाच्या शालिनी पाटील उपस्थित होत्या.

Protected Content