मुंबई- पुण्याच्या धर्तीवर कोरोना स्मार्ट हेल्मेटने शहरात तपासणी

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवसेना जळगाव महानगर व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे जळगाव शहरात कोरोना स्मार्ट हेल्मेट ने शहरातील नागरिकांचे पूर्ण शरीर थर्मल स्कॅन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरु केलेल्या ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी” या अभियाना अंतर्गत सदर मोहीम राबविणायत येत आहे.

सदर हेल्मेट भारतीय जैन संघटना, पुणे तर्फे उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हेल्मेटची किंमत सुमारे १५ लाख रुपये असून पुढील दोन आठवडे सदर मोहीम शहरात राबविण्यात येणार आहे. हेल्मेट हाताळण्यासाठी भारतीय जैन संघटना पुण्याचे चार स्वयंसेवक जळगावात आले आहे.

भारतात असे फक्त चार हेल्मेट उपलब्ध आहे. एका मिनटात अंदाजे २०० लोकांची तपासणी सदर हेल्मट करू शकतो.बुधवारी मेहरूण गाव शिवार येथे शिवसेना नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वात तपासणी करण्यात आली.या वेळी मनपा विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, युवाशक्तीचे संस्थापक विराज कावडीया, इत्यादी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी आबा ढाकणे, विजय कासार, सागर तायडे, इत्यादी परिश्रम घेत आहे.

Protected Content