घोडसगाव येथील मराठाी शाळेची शैक्षणिक सहल संपन्न

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेची सहल औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळी काढण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील जिल्हा परिषद शाळेची सहल अजिंठा, भद्रा मारुती, घृष्णेश्वर मंदिर, वेरूळची लेणी, दौलताबाद किल्ला, औरंगाबाद मधील बीबी का मकबरा, सिद्धार्थ गार्डन, पवनचक्की इत्यादी स्थळांना भेटी देऊन संपन्न झाली. सहलीमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक व ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्यात आली.

 

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपाली दुट्टे यांनी एस. टी.बस.चे पूजन करून शुभेच्छा दिल्या.  यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सहलीचे यशस्वीपणे आयोजन करण्यासाठी मुख्याध्यापक अनिल पवार, भिका जावरे, स्वाती भंगाळे, रूपाली गुरव व मंगलाबाई दांडगे यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content