निस्वार्थी सेवे बद्दल गफ्फार मलिक यांचा विविध संस्था तर्फे गौरव

 

जळगाव, प्रतिनिधी । खानदेशातील सर्वात जुनी मुस्लिम शैक्षणिक संस्था म्हणून अंजुमन तालीमुल मुस्लिमिन जळगाव अर्थातच अँग्लो उर्दू हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष हाजी अब्दुल गफ्फार मलिक यांनी त्यांच्या प्रयत्नांनी समाजाला व सार्वजनिक शैक्षणिक संस्थेस पॅरामेडिकल गटात मेडिकल लॅब टेक्नीशियन हे अभ्यासक्रम मिळवून आणल्याबद्दल त्यांचा जळगाव शहर मानियार बिरादरी व विविध संस्थांतर्फे  फारूक शेख व डॉ. एजाज शेख यांनी शाल व बुके देऊन सत्कार केला.

कलाम पॅरामेडिकल कॉलेजला जळगाव मान्यता

महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण मंडळाने, महाराष्ट्र शासन कौशल्य विकास व उद्योजकता विभाग,मुंबई. तसेच महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई यांचे दिनांक १९ नोव्हेंबरच्या आदेशानुसार प्रताप नगरमध्ये सुरू असलेल्या अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्येच कलाम पॅरामेडिकल कॉलेज जळगावला मान्यता देऊन २५ विद्यार्थ्यांची एक तुकडी, दोन वर्षे अभ्यासक्रमा साठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. संस्थेच्या नावे त्यांनी ही परवानगी आणल्याबद्दल संपूर्ण समाजाने व स्वार्थी शिक्षण सम्राट यांनी दखल घ्यावी असे भावोदगार महाराष्ट्र मन्यार बिरादरीचे तथा जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी मलिक यांचे गौरव करताना व्यक्त केले.

मुस्लिम मानियार बिरादरी व इतर बिरादरीने केले कौतुक

गफ्फार मलिक यांचे इदगाह कार्यालयात आगमन झाल्यावर उपस्थित जळगाव शहर मुस्लिम मानियार बिरादरीचे डॉक्टर एजाज शेख व फारुक शेख यांनी शाल व बुके देऊन गौरव केला. त्यावेळेस अंजुमन तालीमुल मुस्लिमिनचे सलीम शेख, इदगाह ट्रस्टचे अनिस शाह, व नजीर मुलतानी, मुलतानी बिरदारीचे शकिर मुलतानी, शिरसोली संस्थेचे अब्दुल नबी, मर्कजचे अब्दुल रउफ, व सलीम शेख,सालार नगरचे अहेमद शेख चोपडाचे नाझीम शेख आदींची उपस्थिती होती.

Protected Content